Category: लेख/ब्लॉग

मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी व्यवसाय, मार्केटिंग, स्टार्टअप्स, उद्योग, आर्थिक नियोजन आणि व्यवसाय वाढीवरील उपयुक्त मराठी लेख.

‘लेख / ब्लॉग’ या विभागात मराठी उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप्स, स्वयंरोजगार करणारे आणि व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. येथे व्यवसाय कल्पना, मार्केटिंग टिप्स, डिजिटल व्यवसाय, आर्थिक नियोजन, ग्राहक सेवा, व्यवसाय वाढ, ब्रँडिंग, ऑनलाइन उपस्थिती, सरकारी योजना, प्रेरणादायी यशोगाथा आणि उद्योगविश्वातील नवीन घडामोडींवरील दर्जेदार लेख मराठीत वाचता येतील. संपर्क मराठीचे उद्दिष्ट मराठी उद्योजकांना ज्ञान, मार्गदर्शन आणि योग्य माहिती उपलब्ध करून त्यांचा व्यवसाय अधिक सक्षम व यशस्वी बनवणे आहे.

Jul 19
पावर व पोझिशन यात मराठी माणसाची गफलत

आजच्या काळात मराठी समाजासमोर सर्वात मोठे आव्हान कोणते असेल, तर ते म्हणजे पोझिशन (पद) आणि पावर (खरी ताकद) यातील फरक ओळखणे. अनेकदा आपण पद, प्रतिष्ठा, नाव, बॅनर, फोटो, लाल दिव्याच्या गाड्या आणि सभांमधील टाळ्यांना यश समजतो. परंतु वास्तवात या गोष्टींमुळे समाजाचा विकास होत नाही. समाजाला पुढे नेते ती खरी ताकद — ज्ञान, पैसा, उद्योग, कौशल्य, […]

Jul 19
मराठी माणूस आणि राजकारण

राजकारण हा मराठी समाजातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर मराठी समाजाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परंतु सध्याच्या राजकारणाचा अभ्यास केला, तर हे क्षेत्र दिवसेंदिवस घराणेशाहीकडे झुकताना दिसते. महत्त्वाची पदे, निवडणुकीची तिकिटे आणि सत्तेची संधी ही अनेकदा काही मोजक्या कुटुंबांपुरतीच मर्यादित राहतात. सामान्य शेतकरी, कामगार किंवा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील तरुणांना या व्यवस्थेत प्रत्यक्ष […]

Jul 19
जे आहे त्यात उद्योग सुरू करा

एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे झोपड्या बांधून अनेक कामगारांची कुटुंब राहायला होती. त्यांची लहान मुलं तेथेच रेल्वे-रेल्वे खेळत असत. कोणी इंजिन बने, कोणी डब्बे… एक मुलगा फक्त चड्डी घातलेला, तो मात्र रोज गार्डच बनायचा व हातात एक फडकं घेऊन त्यांच्यात खेळायचा. मी त्याला विचारले, “तू रोज गार्डच का बनतोस? इंजिन किंवा डबा का […]

Jul 19
का आहेत ज्यू धर्मीय जगात सर्वात यशस्वी व श्रीमंत ?

माझे मित्र :माझे एक प्राध्यापक मित्र अमेरिकेतील विद्यापीठात ‘काही ठराविक जाती पंथाचे लोक उदा. ज्यू,जैन,पार्षी का यशस्वी व श्रीमंत असतात’ या विषयावर पीएचडी करत आहेत. एक मित्र व बिझनेस कन्सलटंट म्हणून या पी.एच.डी. कामासंदर्भात त्यांचे माझे बरेच बोलणे चालू असते. माझ्या मित्राला हे काम करत असताना अमेरिकेतील विद्यापीठात काही रिसर्च पेपर हाती लागले. त्यात ज्यू […]

Jul 19
न्यूनगंड सोडा व स्वत:तील सुप्त शक्ती ओळखा

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो मराठी लोक मला संपर्क साधतात. सर्वांमध्ये चांगलं टॅलेंट आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, ज्ञानही आहे; पण उद्योग, व्यापार करायचा म्हटलं की एक प्रकारचा न्यूनगंड मनात आहे. व्यापार म्हणजे मराठी माणसाचे कामच नव्हे, असा एक मराठी माणसांच्या मनात स्वत:बद्दल गैरसमज निर्माण होऊन तो मनात इतका घर करून बसलाय की तो काय सहजासहजी निघायला […]

Jul 19
स्वत:ची सिग्नीचर स्ट्रेंथ विकसित करा निवडा स्वत:ची सिग्नीचर स्ट्रेंथ विकसित करा

जीवनात परमोच्च यश व आनंद मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे आपली सिग्नीचर स्ट्रेंथ ओळखणे व ती विकसित करणे. सिग्नीचर स्ट्रेंथ म्हणजे प्रत्येकाला देवाने दिलेली अशी देणगी की एखादे काम करण्यामध्ये आपणास सतत आनंद होतो, कधीही थकवा येत नाही आणि समाजात ही आपली तशीच ओळख होते. उदा. शिकवण्यातील व शिकण्यातील आनंद, शूरता, नेतृत्व, संशोधन, दयाळूपणा, विनोद, कल्पकता, […]

Jul 18
ज्याच्या घरात पैसा खेळतो, त्यालाच समाजात मान मिळतो

एक कथा: एका गावात किश्या नावाच उनाड पोरगं होतं, टारगटपणा करत फिरायचं, गाव त्याल ‘किश्या’ म्हणायचं. किशाला एकदा एक भला माणूस भेटला. त्या माणसाने त्याला छोट्या २० गुंठे जागेत पानमळा लावायचे शिकविले. किश्याने चांगले उत्पन्न काढले, बरा पैसा आल्यावर तो चांगली कपडे घालू लागला. लोक त्याला आता ‘किसन’ म्हणू लागले. थोड्या महिन्यांनी किसनने शेजाऱ्याची जमीन […]